Video Recipe
चिंच गूळ चटणी
साहित्य
- एक वाटी चिंच गरम गरम पाण्यात भिजवा.
- १ कप गूळ
- १/२ कप खजूर
- १ चमचा पांदेलोण ,शेंदेलोण, जिरेपूड,धने पूड ,लाल तिखट (ऑप्शनल )
- ४ चमचे भाजून घेतलेले तीळ
- चिमट भर हींग
- चवी नुसार मीठ
कृती
- चिंच गरम पाण्यात भिजवलेली कोळून व गाळून घ्या. दुसऱ्या पातेल्यात गूळ व बी काढलेला खजूर पण भिजत ठेवा व भीजलेला खजूर पण वाटून गाळून घ्यावा.
- चिंचेचा कोळ ,गूळ व बी काढलेला,वाटलेला खजूर सर्व एका पातेल्यात उकळायला ठेवा.
- जेव्हा ते चांगले उकळले जाईल तेव्हा त्यांच्यामध्ये मीठ व तिखट घालून परत उकळाजर आंबट वाटले तर थोड़ी साखर घाला. खजूरामुळे चटणी दाट होते.
- या वाडग्यात गूळ आणि बियाणे काढलेल्या खजूर घाला. एकदा घट्ट झाल्यावर आचेवरून काढा. त्यात १ पांदेलोण ,शेंदेलोण, जिरेपूड,धने पूड व तीळ पूड घाला. थंड झाल्यावर एका काचेच्या बरणी मध्ये भरून टाका, ती बरीच दिवस फ्रिजमध्ये राहते.
- दहीवाडा, भेळ, समोसा, रगडा प्याटिस इत्यादींसाठी काही पालेभाज्यांचा वापरासाठी हीचा वापर करता येतो.
Tamarind Chutney
Ingredients
- 1 Cup Tamarind soaked in hot water
- 1 Cup Jaggery
- 1/2 Cup date palms
- 1 Tsp Cumin Powder
- 1 Tsp Coriander Powder
- 1 Tsp Red Chili (optional)
- 1 Tsp Black salt
- A pinch of Asafoetida
- Salt per taste
Procedure
- Soak Tamarind, Jaggery and Dates in hot water and grind it into smooth paste and drain the remains
- Boil the mixture for 5 mins
- Add salt, red chili powder, cumin/coriander powder to the mixture and let it boil till it becomes thicker
- Let the mixture cool and when at room temperature, store it in airtight glass bottle and refrigerate.
-------------------------------------------------------------
पुदिना चटणी
साहित्य
- १ कप ,अथवा ५/२० पाने किंवा एक गड्डी
- १/२ कप कोथिंबीर(धुऊन कोरडी करून घेतलेली )
- ७ /8 लसूण पाकळ्या)
- १ इंच आले
- ५/६ पालक पाने (असल्यास)
- 1 लिंबाचा रस
- 2 मिरची (पथ्य असल्यास वापरू नये).
- पुदीना, कोथिंबीर, पालक पाने स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घ्यावीत.मिक्सरमध्ये पुदीना, कोथिंबीर, पालक पाने, आले, लसूण आणि मिरचीचे तुकडे घाला.
- पाणी अजिबात घालू नका , त्यात २ टेस्पून तेल टाकून चटणी बनवा.एक दोनदा चमचाने फिरवून घ्या.लिंबाचा रस घालून कोरड्या काचेच्या बरणित भरून ठेवा.ही फ्रीजमध्ये बरेच दिवस टिकते.त्यात व्हिनेगर घालणे,जास्त काळ टिकते.समोसा,पराठा,भेळ इ.बरोबर चांगली लागते.
Mint Chutney
Ingredients
- 1 cup Mint leaves
- 1/2 cup coriander leaves
- 4/5 spinach leaves
- 2 cut green chili
- 6/7 garlic cloves and some ginger cut
- salt per taste
- 1 Tbsp Lemon juice
- 1 Tsp vinegar
Procedure
- Mix all of the above and grind to a smooth paste.
- Avoid adding water and instead add lemon juice/vinegar to make finer paste. This way you can store chutney longer.
- If need not be stored longer, can add water for making a smoother paste
---------------------------------------------------------------------------------
दुधी भोपळा चटणी
साहित्य
- दूधी भोपळ्याचे साल किसून
- २ मोठे चमचे तीळ कूट
- २ मोठे चमचे शेंगदाणा कूट
- फोडणीचे साहित्य - मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, हळद हींग, चवीनुसार मीठ
- दूधी भोपळा हाताने स्वच्छ धूऊन, किसून घेणे.
कृती
- कढई मध्ये थोडेसे तेल गरम करून त्यामध्ये भोपळ्याचा कीस हाताने पिळून टाकून मंद गॅसवर कुरकुरीत होईतो पर्यन्त परतून घ्यावा. नंतर एका प्लेटमध्ये कुरकुरीत कीस काढून घ्यावा.
- कढ़ईत डावभर तेल घालून मोहरी,जिरे,हिंग,हळद घालून चांगले खमंग परतावे ,मग मिरची आणि लसूण टाकून गुलाबी रंगाचा होईतोपर्यंत परतून घेणे.त्यात किसलेला कीस, दाण्याचा कूट ,तीळकूट ,तिखट ,मीठ टाकून छान सारखे सर्व परतून घेणे.गार झाल्यावर घट्ट झाकण असलेल्या डब्यात भरून ठेवावी.ही बरेच दिवस चांगली कुरकुरीत रहते म्हणून हिला चिवड़ाचटणी असेही म्हणतात. ही पोळी ,भाकरी ,पराठा बरोबर छान लागते.
Bottle Guard/Lauki/Dudhi Chutney
Ingredients
- 1 Lauki grated
- 2 Tbsp sesame powder
- 2 tbsp groundnut powder
- 1 Tsp mustard seeds, cumin seeds, turmeric powder
- A pinch of asafoetida
- Optional curry leaves
- Salt per taste
- 1 Tbsp oil
Procedure
- Remove water from grated lauki as shown in the video
- Roast the dudhi/lauki on lower flame till it turns crispy
- Add oil to the pan and rest of the material to make tadka (mustard seeds, cumin seeds, turmeric powder, asafetida, curry leaves)
- Add sesame powder and groundnut powder and roast
- Add roasted lauki and cook the mixture for a minute
Comments
Post a Comment