Video:
नमस्कार!
मी माझ्या अनुभवानुसार आणि घरच्यांच्या शिकवणीनुसार काही पारंपरिक पद्धती ज्या बाळंतपणातील सव्वा महिने पाळतात त्या तुम्हा सर्वांना सांगू इच्चीते. ह्या पद्धती घरा घरा नुसार वेगळ्या असू शकतात तसेच प्रत्येकाची श्रद्धा, विश्वास आणि तब्येतीनुसार वैद्यांच्या सल्ल्यानुसार ह्यांचे अनुकरण करावे.
हि माहिती पुढील भागांमध्ये मी सांगत आहे.
* पारंपरिक पद्धती
* विशेष आहार
* सव्वा महिने रोजचा आहार
* सव्वा महिने पाळायच्या गोष्टी
* काही औषधे
ह्या मध्ये पहिल्यांदा आपण पारंपरिक पद्धती बघू.
***** बाळंतीणीला घरी आणायच्या वेळेची तयारी *****
दवाखान्यातुन घरात येताना बाळंतीण आणि बाळाला औक्षण करून, भाकरीचा तुकडा उतरवून आत घ्यावं.
घराच्या दाराला दोन्ही बाजूस कडुलिंबाच्या( डहाळी ) फांद्या लावाव्यात.तसेच बाळंतीण बाईच्या कॉट /बेड /खाट जे असेल त्याच्या चारही पायांना हिंगा।चे पाणी लावावे ,त्याने बाहेरील बाधा होत नाही.
**** पाचविची पूजा ****
बाळंतीण झाल्याबरोबर पाचव्या दिवशीही पूजा करतात.देवासमोर दगडी पाट्यावर अगर पाटावर कापुस ,हरळी ,नवीन झबले ,टोपड़े ,लंगोट व जिवती ,कोरा कागद ,पेन,विडा ठेवावा.पूजेत एखादे हत्यार (शष्त्र )ठेवावे. हींग भाजून त्याचा अंगारा(भस्म ) तयार करावा.
हरळीसारखा वंश पसरु देत , कापसा सारखा म्हातारा/म्हातारी होऊ देत ,
असे म्हणून जिवतीची पूजा करावी.केलेल्या स्वयपाकाचा नेवैद्य देवीला दाखवून बाळाच्या गळ्यात ती जिवती घालावी. बाळाला व आईला दवाखान्यामध्ये ,(नेवैद्य ) डब्यात मेथीची भाजी ,भाकरी/पोळी ,गव्हाल्याची खीर द्यावी. हिंगचा अंगारा बाळ ,बाळंतीणीस लावावा.
**** बळीराणा ****
अकराव्या दिवशी बळीराणा करावा. पाटावर /ताटात तांदूळाच्या दोन बाहुल्या काढाव्यात.शेजारी रवी ठेवावी.दुसऱ्या पाटावर /आसनावर बाळास मांडीवर घेऊन बाळंतीण बाईने बसावे. बाहुल्यांना देवी समजून त्यांची व रविची पूजा करावी. हरळी ,कापुस ,हळद -कुंकू ,फुल ,अक्षदा वाहून दूधाचा नेवैद्य दाखवून ,निरंजन लावून देवीची आरती करावी.
मग बाळंतीण बाईने बाळाला घेऊन हातात रवी घेऊन उंबरठ्याच्या आतल्या बाजूस ऊभे रहावे व बाळाला सूर्य दाखवावा. थोड़े दाराबाहेरचे वातावरण दाखवावे.जिला मूल नसेल तिला पलीकडे उभे करावे.तिने बाळंतीणीला '"हरीण कोणाचे "असे विचारवे.बाळंतीणीने नवऱ्याचे नाव सांगावे.मग बाळंतीणीने "बेट कोणाचे "असे विचारावे.तिने तिच्या नवऱ्याचे नाव घ्यावे.मग दोघींनी घरात यावे.तिला पाटावर बसवून देवी बनविलेल्या तांदूळ,नारळ,खण,साजूक तूप यांनी ओटी भरावी. त्या तांदुळाचा भात करून त्यावर साजूक तूप टाकून तो भात फक्त दोघा नवरा - बायकोनेच खावा.बाळंतीणीने तिला वीडयाची दोन पाने व सुंठवडा द्यावा.
**** बारसे ****
१२ व्या दिवशी मुलाचे /१३ व्या दिवशी मुलीचे बारसे करावे.असे केल्याने मुहूर्त बघवा लागत नाहीं.या दिवशी हरबरे भिजत टाकून ,भीजलेले हरबरे मीठ घालून शिजवून/उकडून घेणे. फुटाणे ही चालतात. पाळण्याच्या चारही बाजूस वीडयाची दोन -दोन पाने व त्यावर घुगऱ्या /फुटाणे ठेवावेत. गव्हाचा /तांदुळाचा चौफुला काढून त्यामध्ये बाळंतीणीस (बाळाला घेवून ),व गोप/गोपी (वरवंनटयाला कापड़ घालून ,एखादा दागिना घालून लहन मुलीच्या मांडीवर ठेवणे. तिलाही शेजारी पाटावर बसवावे.आधी गोप/गोपी व मग बाळ - बाळंतीण यांना औक्षण (पाच सवाष्णी असल्यास त्यानी )करावे.पाचवेळा पाच नाव्वानी आधी गोप/गोपी पाळण्यात घालावा.मग बाळास पाचवेळा पाच नाव्वानी पाळण्यात घालावे.आईने पाठीने पाळणा ढकलावा. आत्याने नाव ठेवावे.
Comments
Post a Comment