Video:
----------------------------
हळीव खीर
साहित्य
- ३/४ मोठे चमचे हळीव
- ३/४ मोठे चमचे साखर (आवडीप्रमाणे कमी अधिक )
- चिमुटभर जायफळ /वेलची पूड
- १ मोठा कप दूध
- आवडत असल्यास १/२ बदाम तुकडे करून
कृती
- 3/4 चमचे पाण्यात १/२ तास भिजवून दूधात शिजवून साखर /गूळ घालून हवी तशी दाट -पातळ करावी.
- त्यात जायफळ पूड घालावी.
- आवडत असल्यास १/२ बदाम तुकडे करून घालावेत.
- ३ दिवस देणे.
- ही कमरेकरिता अतिशय उपयुक्त आहे.
***************************************************************************
बदाम खीर
साहित्य
साहित्य
- १/२ वाटी बदाम भिजवून साले काढून वाटून.
- ३/४ मोठे चमचे साखर (आवडीप्रमाणे कमी अधिक ).
- चिमुटभर जायफळ /वेलची पूड.
- २ कप दूध.
कृती
- १/२ वाटी बदाम भिजवून साले काढून वाटावेत.
- २ कप दूधात शिजवावेत .
- साखर व वेलची पूड घालावी.
- ३ दिवस देणे.
- ही बुद्धी व ताकदी साठी अतिशय उपयुक्त आहे.
*********************************8***************************************************************************
खारीक खीर
साहित्य
- १/२ वाटी खारकेची पूड दुधात भिजवून.
- ३/४ मोठे चमचे साखर (आवडीप्रमाणे कमी अधिक ).
- चिमुटभर जायफळ /वेलची पूड.
- २ कप दूध.
कृती
- १/२ वाटी खारकेची पूड दुधात भिजवून.
- २ कप दूधात शिजवावी .
- साखर व वेलची पूड घालावी.
- आवडत असल्यास १/२ बदाम तुकडे करून घालावेत.
- ३ दिवस देणे.
- ही बुद्धीव ताकदीसाठी अतिशय उपयुक्त आहे.
*****************************************************************************************.
साहित्य
- २/३ चमचे खसखस रात्रीं भिजवून ,वाटून.
- ३/४ मोठे चमचे साखर (आवडीप्रमाणे कमी अधिक ).
- चिमुटभर जायफळ /वेलची पूड.
- २ कप दूध.
- आवडत असल्यास १/२ बदाम तुकडे करून घालावेत.
कृती
- १/२ वाटी खसखस रात्रीं भिजवून ,वाटून घ्यावी .
- २ कप दूधात शिजवावी .
- साखर व वेलची पूड घालावी.
- आवडत असल्यास १/२ बदाम तुकडे करून घालावेत.
- आईला दूध कमी येत असेल तर या खीरीने भरपूर दूध येते.
- ३दिवस देणे.
बाजरी खीर
साहित्य
- १/२ वाटी बाजारी भाजून.
- २ चमचे तुप.
- वेलची पूड.
- गरम पाणी.
- २ कप दूध.
- गरम पाणी .
कृती
- १/२ वाटी बाजारी भाजून घ्यावी.
- मिक्सरवर वाटून २ चमचे तुपावर परतून घ्यावी.
- गरम पाणी घालून
शिजवून गूळ घालावा
- वेलची पूड घालावी.
- थंड झाल्यावर दूध घालावे.
- आवडत असल्यास १/२ बदाम तुकडे करून घालावेत.
- थंडीत चांगली कारण ती उष्ण असते
- शक्यतो उन्हाळ्यात ही खीर जास्त वेळा देऊ नये.
*************************************************************************
उष्ण असते
Comments
Post a Comment