Video recipe: https://youtu.be/ajPN4g5LUq8
कच्या डिंकाचे लाडू
साहित्य
- २ वाटी डिंक पावडर ,भीजलेला डिंक
- १/२ वाटी खारीक पावडर
- १/२ वाटी गोडम्बी टुकड़े करून
- १/२ वाटी खसखस भाजून पूड
- १ वाटी सुक्या खोबऱ्याचा किस गुलाबी रंगावर भाजून .
- १ वाटी पिठीसाखर
कृती
- कच्या डिंकची पूड करून त्यात इतके तूप ओतवे की पावडर छान भिजली जाईल .
- ३ दिवस कमीतकमी डिंक पूड भिजवावी .
- खारीक पावडर गरम करून घ्यावी.
- सर्व जिन्नस मिक्स करून (खोबरे ,खारीक ,गोडम्बी ,पिठीसाखर व भीजलेला डिंक.
- सारे कालवून मिक्स करावे.
- त्याचे लिंबा एव्हडे लाडू करावेत
- .हे लाडू बाळंतीण घरी आली की १० दिवस तरी कमीतकमी द्यावेत.
***********************************************************************************************************
हळीवाचे लाडू
साहित्य
- २ नारळ खरवडून
- ५० ग्र्याम हळीव
- २ वाट्या गूळ किसून
- १/२ वाटी साखर
- १/२ जायफळ किसून
कृती
- पहिल्यांदा दोन्ही नारळ फोडून घ्यावेत.
- हळीवात बारीक़ खड़े असतात ,ते स्वच्छ निवडून घ्यावेत.
- फोडलेल्या नारळाच्या पाण्यात हळीव ३/४ तास भिजत ठेवावेत. नारळ खरवडून घ्यावेत.
- खरवडलेला नारळ व भीजलेले हळीव परत मिक्स करून ३/४ तास झाकून ठेवावे.
- नारळाच्या मिश्रणामुळे हळीव
फूगुन आले की त्यात चिरलेला गूळ व साखर घालावी. मंद आचेवर गॅसवर शिजायला
ठेवावे. मधून-मधून ढवळत रहावे.
- लाडू होत आले की कडेने मिश्रण सुटू लागते. हळीव पारदर्शक दिसू लागतात. गूळाचा रंग देखील (काळपट) बदलतो.
- असे झाले की गॅस बंद करून , कोमट असतानाच तूपाचा हात लावून लाडू वळून घ्यावेत.
- हे लाडू जास्त दिवस टिकट नाहीत. साधारण वरील साहित्यात १५/२० मध्यम आकाराचे लाडू होतात. नारळाच्या पाण्यात भिजवल्यामुळे हे लाडू जास्त टिकट नाहीत तरी थोड़ेसेच करावेत.
- रोज १ लाडू १० दिवस नास्टा झाला की द्यावा.ओल्या नारळाला लगेच वास लागतो त्यामुळे ३/४ दिवसांनी फ्रिज मध्ये ठेवून देताना गरम करून अथवा नार्मल टेम्प्रेचरला आला की द्यावा.
मेथीचे लाडू
साहित्य
- २ वाट्या कणिक (अथवा १ वाटी कणिक ,१ वाटी उडिद डाळीचे पीठ )
- २ वाट्या सुक्या खोबऱ्याचा गुलाबी रंगावर भाजलेला किस
- १ वाटी खारीक पूड गरम करून
- १/२ वाटी खसखस भाजून पूड
- १ वाटी मेथी मंद आचेवर भाजून पीठ दळून वा मिक्सर वर करावे.
- २/३ वाट्या गूळ अथवा २ वाटी गूळ १ वाटी साखर (जास्त गोड हवे असल्यास गूळ ३ वाट्या घ्यावा.
- १ वाटी मकणा भाजून पूड
- १ वाटी डिंक पूड तुपावर भाजून
- १/२ वाटी बदाम भाजून तुकडे /पूड
- १ जायफळ किसून
- २ वाट्या तूप
कृती
- पहिल्यांदा सर्व पीठ व सर्व पूड मंद आचेवर भाजून घ्यावीत.
- कणिक,उडिद डाळीचे पीठ,मकणा,बदाम पूड,खारीक पूड ,खोबरे,खसखस पूड,
- जायफळ किसुन घालावे.
- सर्व मिसळवून त्यात थोड़े तूप घालून परत भाजावे.
- त्यामध्ये गूळ घालून ,गूळ वितळला की त्यात मेथी पूड घालून थोडेसे भाजावे.
- ते सर्व मीक्स करून त्यावर १ वाटी तूप पातळ करून ओतावे.
- कोमट असतानाच लाडू वळावेत.
- जर गार झाले तर कढ़ई मध्ये थोड़े थोड़े गरम करून १ चमचा तूप टाकून वळावेत.
- अंदाजे लिंबा एव्हडे ४०/५० लाडू होतात.
- आजकाल मूली आय टी कंपनी मध्ये कामे करतात .
- बाळ अंगावर पीत असल्याने दूध येण्यासाठी, वात कमी होण्यासाठीलाडू खावा.
- इतर सर्व पौष्टिक घटक हयात असल्याने सुरवातीला थोडेसे कड़सर लागले तरी रोज एक लाडू खावा.
- काही दिवसांनी कड़सर पणा
होतो.
डिंक लाडू
साहित्य
- २ वाट्या डिंक
- २ वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस
- १ वाटी खारकेची पूड
- १ वाटी कणिक
- १ वाटी बदाम
- २ वाट्या चिरलेला गूळ
- १ वाटी साखर (हवी असल्यास ,ऑप्शनल )
- १ जायफळ ,थोड़ी वेलची पूड
- १/२ वाटी गोडम्बी ,मकणा
- १/२ वाटी खसखस
- २ वाट्या तूप
- १ वाटी मकणा भाजून पूड
कृती
- पहिल्यांदा खोबरे,कणिक ,खसखस मंद आचेवर गॅसवर भाजून घ्यावी.
- मकणा ,गोडम्बी, खारकेची पूड पण भाजून घ्यावी
- डिंक मंद आचेवर तळून घ्यावा. अथवा थोड़े तूप लावून माइक्रो मधे 1/1 मिनिट ठेऊन फुलवून घ्यावा.
- जर फुलला नाहीतर अजुन १ मिनीट असे करत एखादा खड़ा बोटाने दाबून बघावा,
- जर तो सहज फुटला तर छान समजावे.
- खसखसिची बारीक़ पूड करावी.
- नंतर पराती मध्ये भाजलेले खोबरे कुसकरुन /चुरून ,त्यामध्ये डिंक पण कुसकरुन टाकावा
- गोड जास्त हवे असेल तर त्यात पिठी साखरा ही घालावी.
- थोड्याश्या तुपावर भाजलेली कणिक ,खसखस पूड ,गोडम्बीच तुकडे ,बदाम तुकडे /पूड ,मकणा सर्व मीक्स करावे.
- त्यावर जायफळ व वेलची पूड घालावी.
- मग गूळ मंद आचेवर वितळवून त्यामध्ये २/३ चमचे तूप वितळताना टाकावे.
- वितळलेला गूळ सर्व मिश्रणावर ओतून पटापट झारा अथवा उलथने घेऊन मिसळून घ्यावे.
- कोमट असतानाच लाडू वळावेत.
- डिंक तळून झाल्यावर ३/४ चमचे तूप बाजूंला काढून उरलेले सर्व त्या मिश्रणावर ओतवे.
- ह्या प्रमाणात २०/२५ लाडू होतात.
- जर का मिश्रण गार झाले तर लाडू वळले जात नाहीत ,
- अशावेळेस माइक्रो मध्ये अथवा कढ़ई मध्ये थोड़े थोड़े मिश्रण घेऊन कोमट करावे
- वा त्यात पातळ तूप २ चमचे टाकून सर्व लाडू वळून घ्यावेत.
- पक्क्या डिंकाचे लाडू दिले म्हणजे बाळंतपण संपले असे समजतात
Comments
Post a Comment