Video Recipe
टोमॅटो चटणी (१)
साहित्य
- पाव किलो अथवा ३/४ पिकलेले टोमॅटो
- १ मोठा कांदा बारीक़ चिरून
- ७/८ लसूण पाकळ्या बारीक चिरून
- 10/12 मिरच्या बारीक चिरून घ्या (ऑप्शनल, पथ्य असल्यास घेऊ नका)
- २ चमचे शेंगदाणा
- २ चमचे तिळकूट
- कोरडी लाल / हिरवी मिरची
- फोडणीचे साहित्य - मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, हळद
- मीठ आणि साखर / गूळ चवीनुसार
- अगोदर सर्वांचे बारीक तुकडे करणे(टोमॅटो, कांदा, लसूण , मिरची)
- कढ़ईत डावभर तेल घालून मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून चांगले खमंग परतावे, मग मिरची आणि लसूण टाकणे व कांदा टाकून तो गुलाबी रंगाचा होईतोपर्यंत परतून घेणे.
- कढ़ईवर झाकण ठेऊ नये.
- टोमॅटो टाकून, शिजून मग त्याला तेल सुटले की मग त्यात मीठ, दाण्याचा कूट , तीळकूट ,साखर अथवा गूळ घालून चटणी गॅस वरून उतरवावी.
- ही चटणी २/३ दिवसच टिकते पण पोळी ,पराठा ,थालपीठ बरोबर छान लागते
Tomato chutney (1)
Ingredients
- 3/4 chopped tomatoes
- 1 chopped onion
- 7/8 chopped garlic cloves
- 10/12 green chili chopped (optional)
- 2 Tbsp crushed groundnut powder
- 2 Tbsp crushed sesame powder
- Dry red/green chili (to be fried in oil)
- 1 Tsp mustard seeds
- 1 Tsp cumin seeds
- 1 Tsp turmeric powder
- A pinch of Asafoetida
- Curry leaves
- Salt/Sugar/Jaggery as per taste
- 1 Tbsp oil
Procedure
- Prepare tadka as shown in the video in the hot oil
- Fry garlic cloves in the same till they turn pink
- Add Onion and fry in the same way
- Add tomatoes and fry without covering the mixture till the water is evaporated
- After the friend mixture turns dry, add groundnut and sesame roasted powder
- Add salt/sugar per taste
- Serve when cold
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
टोमॅटो चटणी (2)
साहित्य
- पाव किलो अथवा 3/4 पिकलेले टोमॅटो
- 5/6 लाल मिरची शक्यतो ब्याडगी वापरवी (पथ्य असल्यास घेऊ नयेत )
- 10/12 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या,
- १ इंच बारीक चिरलेल्या आल्याचे तुकडे
- १ चमचा लाल मिरचीपूड,
- १ चमचा मिरीपूड
- २ चमचा व्हिनेगर
- २ दालचिनीचे तुकडे,
- २/3 लवंगा,
- २/4 मिरे
- १ चमचा जिरे,
- १ चमचा हळद पावडर,
- १ चमचा मोहरी,
- हिंग
- १ चमचा सोया सॉस
- १ चमचा लिंबाचा रस
- १/२ कप तेल
- १ चमचा साखर / गूळ
कृती
- एका भांड्यात टोमॅटो आणि मिरच्या पाणी घालून शिजत ठेवा.
- टोमॅटो आणि लाल मिरची शिजल्यावर थंड झाल्यावर मिक्सरवर वाटून घ्या.
- दालचिनी, मिरपूड, लवंगा कुटून घ्यावे तसेच मग कढ़ई मध्ये डावभर तेल तापायला ठेवावे.
- त्या मध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि हळद घाला.लसूण व आल्याचे बारीक़ केलेले टुकड़े टाकून गुलाबी रंगावर परतून झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो आणि मिरच्या शिजवलेला गर टाकून परत छानसे परतून झाले की त्यात दालचिनी, मिरपूड आणि लवंगा यांची पूड घाला.
- चवीनुसार मीठ , व्हिनेगर, सोया सॉस, लिंबाचा रस आणि साखर/गूळ घाला आणि दाट होईपर्यंत शिजवा. या चटणीत व्हिनेगर असल्याने ती बरेच दिवसांपर्यंत टिकते तसेच यापुढे टिकवायची असेल तर तीत सोडियम बेन्जोएट( benzoate) घालावे. पोळी ,पराठा ,थालपीठ बरोबर छान लागते.
Tomato chutney (2)
Ingredients
- 3/4 Tomatoes
- 5/6 red chilies
- 2/3 cloves
- 1 cinnamon
- 1 Tsp red chili powder
- 1 small Ginger chopped
- 1 Tsp black paper powder
- 2 Tbsp vinegar
- 1 Tsp mustard seeds
- 1 Tsp cumin seeds
- 1 Tsp turmeric powder
- A pinch of Asafoetida
- Curry leaves
- Salt as per taste
- 1 Tbsp lemon juice
- 1 Tbsp soy sauce
- 1 Tbsp oil
- 1 Tsp Sugar/jaggery
Procedure
- Cook tomatoes and chillies in the boiling water. After cooked and cold, grind in the mixer to a smooth paste.
- Make tadka in hot oil as shown in the video
- Fry garlic cloves and ginger till they turn pink
- Add tomato puree made and let it cook
- After 2/3 minutes add cinnamon / cloves (powdered)
- Add salt, vinegar, soy sauce, lemon juice, sugar/jaggery and let the mixture cook for 5/7 minutes
- Serve when cold
---------------------------------------------------------------------------------------------------------------
डाळ्याची चटणी
साहित्य
- १ वाटी डाळ
- १ चमचा मोहरी
- चवीपुराते मीठ
- २ हिरव्या मिरच्या (बारीक़ चिरून)
- २/३ चमचे लिंबाचा रस /आवडीनुसार /२/३ चमचे दही
- फोडणीचे सामान (मोहरी १ टी स्पून ,जीरे १ टी स्पून ,हिंग चिमूट भर ,१ टी स्पून उडीद डाळ ,कढीपत्ता ५/६ पाने )
कृती
- मिक्सर मध्ये डाळ ,मोहरी ,बारीक़ चिरलेल्या मिरचीचे टुकड़े सर्व मिक्स करून बारीक़ वाटून घ्यावे. त्यामध्ये थोड़े -थोड़े पाणी घालून परत एकदा सरसरीत वाटून घ्यावे.
- गॅसवर कढल्यात फोडणीसाठी तेल तापयला ठेवावे. तेल चांगले गरम झाले की गॅस बारीक़ करून मोहरी ,जीरे ,हींग,कढीपत्ता , उडीद डाळ घालून फोडणी खमंग तयार करून थोड़ी थंड झाल्यावर चटणी वर घालावी. त्यात लिंबाचा रस घालावा ,अथवा आवडी नुसार दही घालून कालवावी.
- ईडली ,डोसा ,आप्पे ह्यांच्या सोबत छान लागते.
Chana daal (split chickpeas) chutney
Ingredients
- 1 cup chana daal (Split chickpeas lentils)
- salt per taste
- 2 green chilies
- 2/3 Tsp lemon juice Or curd
- 1 Tsp mustard seeds
- 1 Tsp cumin seeds
- 1 Tsp turmeric powder
- A pinch of Asafetida
- Curry leaves
Procedure
- Grind lentils, mustard, chillies in the mixer and turn into a smoother paste by adding water while grinding
- Make tadka as shown in the video by adding mustard seeds, cumin seeds, turmeric powder, curry leaves, asafetida etc.
- Mix the tadka with the paste and serve with Idli,dosa etc.
Comments
Post a Comment