Tamarind-Jaggery Poha (Rice Flakes) | चिंच -गूळ पोहे



हे पोहे लहान मुलांना ,तसेच वयस्कर माणसांना ,सर्वांनाच आवडतीलखूपच यम्मी यम्मी !

साहित्य 
  • १ वाटी जाडे पोहे 
  • लिम्बा एव्हडी चिंच 
  • गूळ (साधारण चिचे इतकाच )
  • १/२ वाटी शेंगदाणे (आवडीनुसार )
  • १ टी स्पून तिखट (आवडी नुसार कमी -जास्त )
  • चवीनुसार मीठ 
  • फोडणीचे सामान (मोहरी १ टी स्पून ,जीरे १ टी स्पून ,हिंग चिमूट भर ,१ टी  स्पून उडीद डाळ ,कढीपत्ता ५/६ पाने )
  • १ टोमॅटो 
  • बारीक़ चिरलेली कोथिंबीर 
  • खोवलेला नारळ वरून टाकण्यासाठी 
  •  बारीक़ शेव 
कृती 
  • सुरवातीला एका कड़ई मधे जाड़े पोहे घेऊन ते मंद गॅसवर गुलाबी रंगावर खमंग भाजून घेणे. 
  • ते थंड  झाले की मिक्सर वर जाड़सर पूड करून ती एका बाऊल मधे काढावी. 
  • चिंच भिजुन कोळून घ्यावी. चिंचे मधे गूळ विरघळून घ्यावा. जर घरी चिंचेची चटणी असेल तर ती थोडीशी पातळ करून घ्यावी. हे चिंच -गूळाचे पाणी पोह्यांवर टाकावे. 
  • पोहे चांगले कालवून त्यावर झाकण ठेऊन अर्धा तास ठेऊन द्यावेत. 
  • पोहे छान भिजुन मऊ झाले की त्यावर तिखट , चवीनुसार मीठ ,टॉमेटो ,बारीक़ चिरलेला कांदा ,कोथिंबीर घालून छानसे मिक्स करून घ्यावे. 
  • गॅसवर कढल्यात फोडणीसाठी तेल तापयला ठेवावे. तेल चांगले गरम झाले की गॅस बारीक़ करून त्या मधे  शेगदाणे तळून बाजूला डिश मधे काढून ठेवावेत मग मोहरी ,जीरे ,हींग,कढीपत्ता ,  उडीद डाळ व् सर्वात शेवटी हळद घालून  फोडणी खमंग तयार करून 
  • पोह्यांवर थोड़ी थंड झाल्यावर घालावी. परत एकदा सर्व पोहे छानसारखे मिक्स करावेत. 
  • द्यायच्या वेळीस एका बाऊल मधे पोहे,त्यावर वरून बारीक़ चिरलेला कांदा , कोथिंबीर ,शेगदाणे,बारीक़ शेव ,ओले खोबरे असे सर्व घालून  संध्याकाळच्या नाष्टा यम्मी यम्मी बनवावा. 

Ingredients
  • 1 cup thick poha (rice flakes)
  • 1 tamarind
  • Jaggery similar to tamarind proportion
  • 1/2 cup deep friend peanuts  (optional, as per taste)
  • 1 Tsp red chilli powder (optional, as per taste)
  • Salt as per taste
  • 1 finely chopped tomato  (optional, as per taste)
  • 1 Tbsp oil
  • 1 Tsp mustard seeds
  • 1 Tsp cumin seeds
  • 1 Tsp urad daal
  • 1 Tsp turmeric powder
  • Curry leaves as per taste
  • A pinch of Asafetida

Dressing:
  • Finely chopped coriander as per taste
  • Shredded coconut as per taste
  • Some fine sev as per taste

Procedure
  • Soak tamarind in water and use that water mixed with jaggery or use tamarind chutney if available
  • Dry roast one cup poha and make fine powder of the same on the mixer
  • Mix the powder with soaked water above and keep it aside for an hour
  • The soaked poha will double in size (Approx 2 cups)
  • Prepare hot oil dressing - Heat 1 Tsp oil and add mustard seeds, cumin seeds, urad daal, a pinch of asafoetida, turmeric powder, curry leaves as shown in the video
  • Take the soaked poha in a bowl and add tomatoes, onions, peanuts and oil mixture as shown in the video. Add salt as per taste
  • Serve dressed with coriander, coconut and sev as per taste




    Comments