Video:
https://youtu.be/KYhURLT-i8A
साहित्य
- १ वाटी कोणताही पास्ता (शेल , मॅकरोनी, etc )
- १/ ३ वाटी बटर
- १ ते दीड वाटी चीज (Mozzarella) मोझेरीला चीज , पारमेसन (parmesan) अगर जे उपलब्ध असेल ते
- २ ते अडीच कप दूध
- ३ मोठे चमचे तेल (शक्यतो ऑलिव ऑईल घ्यावे.)
- आवडी नुसार भाज्या (मशरूम ,गाजर ,(Broccoli )ब्रोकोली
- चवीनुसार मीठ
- मीरपुड़
- बेसिलची ताजी धूतलेली स्वच्छ २०/२५ पाने
- लसणाची कोरडी पावडर (Dry garlic )
- १ चमचा मैदा / गव्हाचे पीठ
- १ चमचा शेंगदाणा /काजूची पावडर (ऑप्शनल आहे )लहानमुलांना ऍलर्जी असू शकते.
कृती
- १ कप शेल पास्ता (कोणताही पास्ता वापरू शकता ) ३ कप पाण्यामध्ये उकळत ठेवावा.
- थोडेसे मीठ ,(१/२छोटा चमचा) २ मोठे चमचे तेल ( ऑलिव ऑईल) टाकून सतत हलवत रहावे
- जेणेकरून तो बुडाला लागणार नाही. करपणार नाही.
- शक्यतो हा शिजण्यांस १० ते १५ मिनिटे (मध्यम गॅस फ्लैम वर ) लागतात.
- जर पास्ता कच्चा वाटला तर अजून २/३ मिनिटे शिजू द्यावा. एखादा पीस बोटावर घेऊन चेक करावा.
- मऊ शिजलेला असावा.
- शिजलेला पास्ता चाळणी मध्ये टाकून त्यावर गार पाणी टाकून निथळून घ्यावा.
- आता पास्ता बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या (तुम्ही गाजर ,मशरूम ,घेवड़ा,ढोबळी ,शिमला मिरची,बेबी कॉर्न,(Broccoli )ब्रोकोली)
- कढ़ई मध्ये २ मोठे चमचे बटर टाकून ज्या भाज्या वापरणार आहोत त्या परतून घ्याव्यात.
- त्या जराशा (crunchy )क्रुञ्ची झाल्या की पासत्यासाठी बेसिल सॉस व व्हाईट सॉस तयार करायचे.
- त्यासाठी बेसिल पाने ,(Mozzarella )मोझेरीला चीज,१/२ चमचे ऑईल हे सर्व मिक्स्र मधून फिरवून
- त्याची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यावी,पाणी अजीबत घालू नये. आता गॅस वर कढ़ई ठेऊन त्यामध्ये २ चमचे बटर घालावे.
- ते विरघळले की त्यामध्ये मैदा घालून सतत हलवत हलकासा कलर बदलेतो पर्यन्त परतून घ्यावे, मग त्यामध्ये दूध,चीज घालावे.
- सतत हलवत रहावे की जेणेकरून त्यात गुठळया होणार नाहीत.
- सॉस दाट व्हायला साधारण 5/6 मिनिटे लागतात.
- ते दाट व्हायला लागले की त्यामध्ये मीरपूड ,लसणाची कोरडी पावडर (Dry garlic ) घालून तो परत सारखा करणे.
- त्यात बेसिल पेस्ट ,परतलेल्या भाज्या घालून मग त्यात पास्ता घालणे. बेसिल सॉस २ /३ मिनिट मधेच तयार होतो.
- अशारितीने आपला पेस्तो पास्ता तयार झाला की एका बाऊल मध्ये काढून त्यावर मीरपूड,पारमेसनचीज पसरून गार्निश करावा.
- लहान मुलांना अतिशय आवडतो.
Ingredients
- 1 cup organic shell (any available) pasta
- 1/3 cup butter
- 1.5 cups Mozzarella cheese (or any available)
- 2.5 cups milk
- 3 Tbsp oil (Olive oil preferred)
- Veggies of choice (Broccoli, Mushrooms, Carrots, Beans etc)
- Salt as per taste
- 20/25 fresh basil leaves
- 1 Tsp black pepper
- 1 Tbsp garlic powder (chopped garlic cloves)
- 1 Tbsp white flour
- (optional) pine nuts/cashews
- (optional) red chilli flakes
Procedure
Basil Sauce
- Mix basil leaves, olive oil, cheese, black pepper and (optional) pine nuts
- Make them into smooth paste on the mixer
White Sauce
- Take 2 Tbsp of butter in pan and add 1 tbsp of white flour into it. Roast it for a minute
- Add 2.5 cups of milk to it and mix well. Avoid forming lumps.
- Add black pepper and garlic powder as per taste to the mixer
- Add 1 cup of cheese to the same and turn it into a thicker paste
Pasta procedure
- Saute veggies in butter
- Boil pasta as shown in the video in hot water with a pinch of salt and 1 tbsp oil
- Add Basil sauce to white sauce and mix well
- Add veggies and pasta to the sauce and let it cook for a minute or so
- Serve fresh with dressings of pepper/salt/chili flakes/cheese.
Comments
Post a Comment