Video recipe:
साहित्य (मध्यम आकाराच्या ५/६ कूरडया)
- १ वाटी तांदुळाचे पीठ
- १ चमचा जीरे पूड
- १/२ चमचा हळद
- चिमुटभर हिंग
- १ छोटा चमचा ओवा
- १ छोटा चमचा पांढरे तीळ / कलौंजी
- १ मोठा चमचा तेल
- १ चमचा तूप
- १ चमचा लिंबाचा रस
- चवी पुरते मीठ
कृती
- एका भांडयात १ वाटी पाणी घेऊन ते गॅसवर ठेवावे.
- पाण्याला उकळी आली की गॅस फ्लेम मंद करुन त्या मध्ये तेल ,हळद ,जीरा पूड ,हींग ,ओवा (हातावर कुसकरुन /चोळून), तीळ अथवा कलौंजी व चवीपुराते मीठ घालून ते व्यवस्थीत ढवळून झाले की त्या मध्ये हळूहळू तांदळाचे पीठ टाकावे व एकसारखे ढवळत रहावे,जेणे करून पीठाची गुठळी होणार नाही.
- पीठ शिजले की त्यावर झाकण ठेऊन त्याला चांगली वाफ आणावी व गॅस बंद करावा.
- नंतर पीठ गरम असतानाच एका परातीत /डिश मध्ये काढून घ्यावे. हाताला तेल लाऊन ते जरा गरम-गरमच छान मळून घ्यावे.
- कुरडई करायचा सोऱ्या घेऊन त्याला आतील बाजूस तेल लाऊन त्यामधे पिठातील छोटा गोळा घालावा. ताटलीला थोडेसे तेल लाऊन त्यावर कुरडई घालावी.
- कुकरमध्ये अथवा कढईत पाणी घालून त्यामधे कुरडई वाफ येण्यासाठी ठेऊन द्यावी.
- चांगली दरदरुन वाफ आली की ती ताटलीं काढून दूसरी ठेवावी.
साधारण मध्यम आकाराच्या ५/६ कूरडया होतात. खायला देते वेळीस त्याच्यावर चमचाभर तूप टाकून ,बरोबर पुदिना चटणी /नारळाची चटणी द्यावी.
- 1 cup rice flour
- 1 Tablespoon (Tsp) cumin powder
- 1/2 Tsp turmeric powder
- A pinch of Asafoetida
- 1 Teaspoon Ajwain
- 1 Teaspoon Sesame seeds
- 1 Tsp Oil
- 1 Tsp Butter
- 1 Tsp lemon juice
- Salt as per taste
- Boil one cup of water
- Add cumin powder, turmeric powder, lemon juice, salt, Ajwain, Sesame seeds, oil, butter. Mix those ingredients well.
- Slowly add rice flour to the mixture and keep steering to avoid forming lumps.
- Cover the mixture for 1 minute on very low flame to let it steam.
- Once the mixture is cooked, knead the dough carefully while the mixture is warm (please apply cold water on hands and oil as needed).
- Form noodle pancakes of the dough as shown in the video by using noodle maker.
- Steam these noodle pancakes using steam cooker as shown in the video.
- Serve with any chutney or ghee once cooled down and ready.
Comments
Post a Comment