ज्वारीचे थालीपीठ (बाळंतिणीसाठी खास) । Jowar Thalipeeth (For New Moms)




Video recipe:
https://youtu.be/tPmj7AlEKQk

Please find the English version below

ज्वारीचे थालीपीठ 

साहीत्य: (2 थालीपीठ)

  • १ वाटी ज्वारी पीठ 
  • २ चमचे तांदूळ पीठ
  • २ चमचे कणिक 
  • ४ लसूण पाकळ्या बारीक चिरून 
  • १ चमचा धणे पूड
  • १ चमचा जिरे पूड 
  • चिरून कोथिंबीर
  • १ छोटा चमचा ओवा 
  • १ छोटा चमचा हिंग 
  • १/२ चमचा तीळ 
  • १/२ चमचा हळद 
  • १/४ चमचा काळी मिरी पूड
  • १ चमचा तेल
  • ३/४ वाटी गरम पाणी  (आवश्यकतेनुसार)
  • चवी पुरते मीठ


कृती  
प्रथम परातीत किंवा एका बाऊल मध्ये ज्वारीचे पीठ, तांदुळाचे पीठ, कणिक, धने -जिरे पूड, काळीमिरी जाडसर कुटलेली,  ओवा हातावर घेऊन कुस्करून, लसणाचे तुकडे, हिंग, हळद व चवी पुरते मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परत सर्व एकत्र मिसळून घ्यायचे. थोडेसे  कोमट केलेले पाणी घेऊन हे पीठ कालावयाला सुरवात करायची. एकदम पाणी न घालता हळूहळू घालून पिठाचा फार घट्ट नाही व फार सैलसर हि नाही असा गोळा मळून घ्यायचा.हा गोळा 15/20 मिनिटे झाकून ठेवायचा.

तवा घेऊन त्याला सर्व तव्यावर हाताने पसरून एक चमचा तेल लावायचे.  आपण केलेल्या पिठाच्या गोळ्यातील निम्मे पीठ काढून त्याचा एक गोळा
बनवायचा. तेल लावलेल्या तव्यावर थोडेसे तिळ गोलसर टाकून त्यावर तो गोळा ठेऊन हलकेच थापत, लागलेतर पाण्यात बोटं  बुडवून थालपीठ थापायचे. मग मध्ये एक व बाजूला चार  भोके पडून त्या भोकामध्ये व कडेला थोडेसे तेल टाकून मध्यम  आचेवर, झाकण ठेऊन थालपीठ भाजायला ठेवायचे. साधारण 7/8 मिनिटांनी उलथण्याच्या साहाय्याने हलकेच बघून (खरपूस गुलाबी रंग )ते पलटी करायचे  व परत 5/6 मिनिटे मंद गॅसवर भाजायचे.


काळ्या मिरीची चटणी 
साहित्य 

  • 1/2 चमचा काळी  मिरी 
  • 1 खोबऱ्याचा तुकडा /2 चमचे किसलेले गुलाबी रंगावर खरपूस भाजलेले  खोबरे (खोबऱ्याचा तुकडाही गॅस वर भाजून  घेणे ) 
  • 4/5 लसणाच्या पाकळ्या 
  • चवी पुरते मीठ 


कृती
खलबत्यात भाजले खोबरे, लसूण पाकळ्या, काळी  मिरी, मीठ घालून जाडसर कुटावे. हि चटणी ताजीताजी म्हणजे 1/2 दिवस पुरेल इतकीच करावी.


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Jowar Thalipeeth

Ingredients: (Makes 2 Thalipeeths)

  • 1 cup Jowar flour
  • 2 Tsp. Rice flour
  • 2 Tsp. Wheat flour
  • 4 Garlic Gloves 
  • 1 Tsp Cumin powder
  • 1 Tsp Coriander powder
  • Some cut Coriander leaves
  • 1 Teaspoon Ajwain
  • A pinch of Asafoetida
  • 1/2 Tsp Turmeric
  • 1/2 Tsp Sesame seeds
  • 1/4 Tsp Black pepper crushed
  • 1 Tsp Oil 
  • 3/4th cup lukewarm water (as needed)
  • Salt per taste


Procedure
Mix all the above ingredients in a flat bowl. Adding lukewarm water as needed make a dough as shown in the video. Rest the dough for 15/20 mins.
Take a pan and coat it with oil. Sprinkle some sesame seeds on the same. Slowly apply the dough on the pan flattening it making a round shape as shown in the video. Make 3/4 holes into the same to let it bake nicely. Keep it covered on the medium flame 5/6 mins till the upper side gets baked. Flip after upper side turns slightly brown and roast from both sides nicely.
Serve with chutney and butter once ready.


Black Pepper Chutney

Ingredients: 

  • 1/2 Tsp Black pepper 
  • Shredded roasted coconut as per choice
  • 4 Garlic cloves 
  • Salt per taste


Procedure
Crush all the above ingredients in crushing bowl as shown in the video till they turn into light powdered form. Serve the chutney with the thalipeeth. 

Comments